Amol Mitkari Cheque: आव्हाडांनी एकट्याने तुतारी वाजवावी, चॅलेंज पूर्ण केल्यास 1 लाखाचा चेक

जितेंद्र आव्हाडांनी एकट्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनात तुतारी वाजवण्याचं आव्हान अमोल मिटकरी यांनी दिलं होतं.

जितेंद्र आव्हाडांनी एकट्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनात तुतारी वाजवण्याचं आव्हान अमोल मिटकरी यांनी दिलं होतं. जितेंद्र आव्हाडांनी हे चॅलेंज पूर्ण केल्यास 1 लाखाचा चेक अमोल मिटकरी देणार होते. मात्र अमोल मिटकरींनी चेकचा तपशील लिहीताना चुकवला. चेकमध्ये नावाच्या जागी रक्कम लिहली.

जर आव्हाड साहेबांनी माझं चॅलेंज स्वीकारलं असेल तर मी पण माझ्या उत्तराला तयार आहे एक लाख रुपयाचा चेक माझा त्यांच्या नावाने तयार आहे 26 तारखेपासून महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईला पार पडत आहे, विधान भवनला पहिल्या दिवशी जितेंद्र आव्हाडांनी स्वतः तुतारी आणावी पत्रकारांसमोर ती वाजवावी आणि हा एक लाख रुपयांचा चेक, माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याकडून ज्याला पन्नास हजार रुपये महिन्याच्या पगारावर अजित दादांनी ठेवल आहे असं वारंवार आव्हाड म्हणतात त्यांनी मात्र दोन महिन्याचा पगार घेऊन जावा. पण त्यांनी एकट्याने वाजवावी आणि तुतारीच्या तोंडातून आवाज काढावा ही माझी अट आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले होते. मात्र अमोल मिटकरींनी चेकचा तपशील लिहीताना चुकवला. चेकमध्ये नावाच्या जागी रक्कम लिहली.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com