santosh banghar Team Lokshahi
व्हिडिओ
Video: आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांचा हल्ला
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीमध्ये घडला हा प्रकार
शिंदे गटा विरोधात आतापर्यंत शिवसैनिकांकडून केवळ रोष आणि घोषणाबाजी केलेले बघितल्या जात होते. मात्र, अमरावतीमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आमदार संतोष बांगर यांचा ताफा अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीमध्ये दाखल होताच संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला चढवला आहे. 50 खोके एकदम ओके, गद्दार अशा घोषणा देत शिवसैनिक संतोष बांगर यांचा गाडीसमोर आडवे झाले. त्यावेळी शिवसैनिकांनी गाडी थांबवली नाहीतर शिवसैनिकांनी गाडीच्या काचावर हाताने मारलेही. त्यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेना शिंदे गटात वाद वाढण्याच्या शक्यता आहे.