व्हिडिओ
Amruta Fadnavis | फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी; मिसेस मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी; अमृता फडणवीस यांच्या पहिल्या प्रतिक्रियेत जनसेवेचा उल्लेख
राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं. आझाद मैदानावर भव्य शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्या म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याचा आनंद आहे. फडणवीस कायम जनसेवा करत राहणार अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.