छत्रपती संभाजीनगरमध्ये अंगणवाडी सेविका आक्रमक

छत्रपती संभाजी नगरात अंगणवाडी सेविकांचं आंदोलन असणार आहे. क्रांती चौक ते जिल्हा परिषदपर्यंत मोर्चा काढणार आहे.
Published by :
Team Lokshahi

छत्रपती संभाजी नगरात अंगणवाडी सेविकांचं आंदोलन असणार आहे. क्रांती चौक ते जिल्हा परिषदपर्यंत मोर्चा काढणार आहे. विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झाले आहेत. छत्रपती संभाजी नगरात आज अंगणवाडी सेविकांचे जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे. शासकीय सेवेत सामावून घ्यावे, वेतन वाढवून देण्यात यावी अशी अंगणवाडी सेविकांची मागणी आहे. जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविकांचा जिल्हा परिषदेकडे महामोर्चा काढला जाणार आहे. महिनाभरापासून अंगणवाड्या बंद तर दुसरीकडे अंगणवाडी सेविकांचे आंदोलन करण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com