Anganwadi Sevika Protest : मानधन वाढ आणि पेन्शनसाठी अंगणवाडी सेविकांचं जेलभरो आंदोलन

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना तुटपुंज मानधन मिळत आहे. त्या मानधनात भरीव वाढ करावी, अशी मागील अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी संघटना राज्य शासनाकडं करीत आहे.
Published by :
Team Lokshahi

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना तुटपुंज मानधन मिळत आहे. त्या मानधनात भरीव वाढ करावी, अशी मागील अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी संघटना राज्य शासनाकडं करीत आहे. मात्र, त्यांच्या मागण्यांकडे राज्य सरकारनं दुर्लक्ष केल्यानं भंडारा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी 4 नोव्हेंबरपासून अंगणवाडीतील बालकांना शिकविण्याचं काम बंद करत आंदोलन केलं आहे. राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज नववर्षाच्या पहिल्या दिवशीच जिल्ह्यातील सुमारे दोन हजारपेक्षा अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी जेलभर आंदोलन केलं. यावेळी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com