Anil Deshmukh : चंद्रकांत पाटील किती दिवस अन्याय सहन करणार?

चंद्रकांत पाटलांकडून पुण्याचं पालकमंत्रिपद काढून घेतल्यानंतर आता विरोधकांनी चंद्रकांत पाटलांवर टीकेचे बाण सोडायला सुरुवात केली आहे.

चंद्रकांत पाटलांकडून पुण्याचं पालकमंत्रिपद काढून घेतल्यानंतर आता विरोधकांनी चंद्रकांत पाटलांवर टीकेचे बाण सोडायला सुरुवात केली आहे.

शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुखांनी चंद्रकांत पाटलांबाबत ट्विट केलं आहे. चंद्रकांत पाटील किती दिवस अन्याय सहन करणार, असा सवाल अनिल देशमुखांनी विचारला आहे. एकेकाळी महसूलमंत्रिपदासह आठ खाती सांभाळण्याचा अनुभव असलेल्या चंद्रकांत पाटलांचं डिमोशन पाहवत नाही असा टोला अनिल देशमुखांनी लगावला आहे. यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com