Anil Khochare vs Rohit Pawar : अनिल खोचरे यांचे आमदार रोहित पवारांना प्रत्युत्तर

रोहित पवार यांची तानाजी सावंतावर सडकून टीका आहे.
Published by :
Dhanshree Shintre

रोहित पवार यांची तानाजी सावंतावर सडकून टीका आहे. रोहित पवारांकडून तानाजी सावंतांचा खेकडा म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे. सांवत नवीन मतदारसंघ शोधत आहेत असा रोहित पवारांचा दावा आहे. यावर अनिल खोचरे यांनी आमदार रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

अनिल खोचरे रोहित पवार यांना प्रत्युत्तर देत म्हणाले की, अभ्यासू आमदार रोहित पवार यांच्या आमच्या धाराशिवच्या पालकमंत्र्यावर एक वक्तव्य केलं आणि ते असं म्हणाले की डॉ. प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब हे पुण्याच्या आजूबाजूचा मतदार संघ शोधत आहे. परंतू पवार साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो की येणारा काळ आणि वेळ ठरवेल कोण नवीन मतदारसंघ शोधतोय आणि परत परत जर असे वक्तव्य करत राहिलात तर तुम्हाला जश्यास तसे उत्तर दिले जाईल. एवढं आपण लक्षात ठेवावं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com