Anil Parab On Thackeray Brothers : 'दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, आम्ही हात पुढे केला आहे'; परब स्पष्टच बोलले
आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान त्यांनी अनेक चर्चांवर भाष्य केले. त्यांनी शिवसेनेच्या सध्याच्या परिस्थितीवर बोलताना म्हटलं की," सर्व पक्ष आपल्या आपल्या ताकदीचा अंदाज घेत आहे. जे पैशाला बळी पडतात ते तिकडे जातात. लपत छपत गेलेले कार्यकर्ते हे त्यांच्यापैकी एक आहेत. प्रत्येक वेळेस हे बदल होतात. आमचा जीव कार्कर्त्यांमध्ये आहे. शिवसेना दुभगावी हेच मुख्य कारण आहे".
तसेच पुढे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबद्दल बोलताना म्हणाले की, "महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या इच्छेसाठी जर हे ठाकरेबंधू एकत्र येणार असतील तर, त्याला आम्ही प्रतिसाद दिला आहे. उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, आमच्याकडून सर्व मतभेद विसरायला तयार आहे. त्यामुळे आमच्याकडून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आम्ही आमचा हात पुढे केलेला आहे. निर्णय प्रक्रिया जी आहे ती दोन नेते भेटून ठरवतील व निर्णय घेतील".