व्हिडिओ
Nashik Mama Rajwade : ठाकरे गटाच्या माजी महानगरप्रमुखाच्या अडचणीत वाढ! नुकताच भाजपमध्ये केला होता प्रवेश
भाजप पदाधिकारी आणि ठाकरे गटाचे माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मामा राजवाडे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
भाजप पदाधिकारी आणि ठाकरे गटाचे माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मामा राजवाडे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. विनयभंग, खंडणीसह जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मामा राजवाडे आणि त्यांच्या साथीदारांवर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पंचवटीत एका बार चालकाकडून 50 हजार रुपयांचा हप्ता उकळण्यासाठी कृत्य केले होते. मामा राजवाडेसह 12 जणांवर गुन्हा दाखल. तसेच याआधी गंगापूर रोडवरील विसे मळा परिसरात घडलेल्या गोळीबार प्रकरणी मामा राजवाडे अटकेत असून सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तसेच गंगापूर रोड गोळीबार प्रकरणानंतर मामा राजवाडे यांच्यावर पुन्हा एक गुन्हा झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येते. मामा राजवाडेनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला.