व्हिडिओ
AI वापराला गती मिळणार, AI धोरण तयार करण्यासाठी टास्क फोर्सची नियुक्ती
एआय धोरणासाठी राज्यात टास्क फोर्स, पुढील तीन महिन्यांत शिफारसी, एआय वापराला गती देण्याचा प्रयत्न.
राज्यात एआय धोरण तयार करण्यात येणार आहे. यासाठी टास्क फोर्स नियुक्त करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांत टास्क फोर्स शिफारस करणार असून राज्यात एआय वापराला गती देण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती मिळत आहे.
माहिती तंत्रज्ञान संचालनालय विभागाच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यात 16 सदस्य असतील, गुगल, महिंद्रा ग्रुप, एचडीएफसी लाईफ अशा खासगी संस्थांवरील अधिका-यांचाही समावेश असणार आहे.