Dhule: विविध मागण्यांसाठी धुळ्यात आशा सेविका, गटप्रवर्तक रस्त्यावर

धुळ्यात आशा सेविका, गटप्रवर्तक रस्त्यावर आले आहे. पगार वाढीसह विविध मागण्यांसाठी एल्गार पुकारला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

धुळ्यात आशा सेविका, गटप्रवर्तक रस्त्यावर आले आहे. पगार वाढीसह विविध मागण्यांसाठी एल्गार पुकारला आहे. आश्वासन देऊनही अंमलबजावणी न केल्याने संप पुकारला गेला आहे. आशा व गटप्रवर्तकांना काही महिन्यांपूर्वी केलेल्या आंदोलन वेळी अशांना सात हजार रुपये व गटप्रवर्तक यांना दहा हजार रुपये मानधनात वाढ करून दिवाळी बोनस म्हणून दोन हजार रुपये देऊ अस आश्वासन राज्य सरकारच्या वतीने देण्यात आल होत. मात्र खऱ्या अर्थाने हे आश्वासन जरी दिल गेलं असलं तरी मात्र या आश्वासनाची पूर्तता झाली नाहीये. या आश्वासनाची अमलबजावणी तातडीने व्हावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी अशा गटप्रवर्तक कर्मचारी युनियनच्या वतीने पुन्हा एकदा संपाच हत्यार उपसण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com