INDIA Alliance: चंद्राबाबू नायडू, नितीश कुमारांना आघाडीत आणण्याचे अखिलेश यादवांकडून प्रयत्न

इंडिया आघाडीकडून सत्ता स्थापनेची तयारी केली जात असल्याची माहिती आहे.
Published by :
Dhanshree Shintre

इंडिया आघाडीकडून सत्ता स्थापनेची तयारी केली जात असल्याची माहिती आहे. इंडिया आघाडी पक्ष ज्यामध्ये सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते त्या इंडिया आघाडीकडून सत्ता स्थापनेची तयारी सुरु असल्याची माहिती मिळतेय. चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार यांनी आघाडीत आणण्याचे प्रयत्न सुद्धा सुरु आहेत. कारण चंद्राबाबू नायडू यांच्यावर ईडीची कारवाई झाली होती. भाजपने त्यांच्यावर टीका केल्याचे पाहायला मिळालं होतं. याच पार्श्वभूमीवर त्यामुळे चंद्राबाबू नायडू आपल्या या अपमानाचा बदला घेणार का अशा पद्धतीचे पोस्ट काँग्रेसकडून टाकल्या जात आहेत.

दुसरीकडे आहेत नितीश कुमार जे इंडिया आघाडीच्या पक्षामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होते. पण लोकसभा निवडणुकीच्या काही दिवसाआधीच त्यांनी एनडीएचा हात धरलेला होता. आणि त्यामुळे नितीश कुमार सुद्धा पुन्हा एकदा इंडिया आघाडीमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. याच दोघांच्या जोरावर इंडिया आघाडीकडून सत्ता स्थापनेची तयारी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. अखिलेश यादव ज्यांनी उत्तर प्रदेशमध्ये चांगली कामगिरी केली आहे. सपाचे 35 पेक्षा जास्त याठिकाणी खासदार निवडून आले. त्याच अखिलेश यादव यांच्यावर या दोघांची मन वळवण्याची जबाबदारी दिली असल्याची माहिती समोर येत आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये रणनिती ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com