Ayodhya Ram Mandir: प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज

अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा उद्या पार पडतोय. या अनुषंगाने भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश तर्फे उद्या विविध ठिकाणी जल्लोषाचे जंगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Published by :
Team Lokshahi

अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा उद्या पार पडतोय. या अनुषंगाने भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश तर्फे उद्या विविध ठिकाणी जल्लोषाचे जंगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नरीमन पॉईंट येथील प्रदेश भाजप कार्यालयाबाहेर रामाच्या ३० फुटी प्रतिमेची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. त्यासोबतच अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिकृतीचे ही मॉडेल याठिकाणी दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. तसेच अयोध्येतील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता यावे यासाठी एक मोठी स्क्रीन या ठिकाणी लावण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com