Baba Siddique : मिलिंद देवरांनंतर काँग्रेसला आणखी एक धक्का, बाबा सिद्दिकी अजित पवार गटाच्या वाटेवर?

काँग्रेसचे दोन बडे चेहरे लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
Published by :
Dhanshree Shintre

काँग्रेसचे दोन बडे चेहरे लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष जीशान सिद्धकी आणि त्यांचे वडील माजी आमदार बाबा सिद्दिकी अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. जीशान सिद्धकी आपला राजीनामा वरिष्ठांकडे सुपूर्द करणार असून 10 फेब्रुवारीला वांद्रे येथे होणाऱ्या सरकार आपल्या दारी कार्यक्रमात अजित पवार गटात प्रवेश करणार आहे. सिद्धकी कुटुंबीयांमुळे अजित पवार गटाची मुंबईत ताकद वाढणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com