बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना भारत दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जून ला पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीला अनेक देशांचे नेते येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Published by :
Team Lokshahi

पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जून ला पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीला अनेक देशांचे नेते येणार असल्याची माहिती मिळाली आहे. उद्या तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पद आणि गोपनियतेची शपथ घेतील, आणि यावेळी काही देशांच्या वरिष्ठांना, पक्षनेतृत्वांना, नेत्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे.

यामध्ये बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना देखील निमंत्रित करण्यात आल्याचं कळतंय. दूसरीकडे मालदिवच्या प्रमुखांना देखील बोलवण्यात येईल असं म्हटलं जातयं. तर श्रीलंकेच्या विक्रम सिंग यांचा देखील या प्रमुख अतिथींमध्ये समावेश असल्याची माहिती आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com