व्हिडिओ
Baramati | Supriya Sule | बॅनरवर सुप्रिया सुळेंचा 'भावी मुख्यमंत्री' उल्लेख | Marathi News
बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या संदर्भात जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. बॅनरवर सुप्रिया सुळेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे.
बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या संदर्भात जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. बॅनरवर सुप्रिया सुळेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे. मुस्लीम तरुणांकडून ही बॅनेरबाजी करण्यात आलेली आहे. तर या बॅनेरची बारामतीमध्ये जोरदार चर्चा रंगलेली समोर येत आहे.
यापार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार म्हणाले, बॅनेरवर सगळेच आपले आपले पक्ष लावतात. आपल्या समर्थकांचे बॅनेर लावत असतात. पण महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. हे 100 टक्के होणार आणि महाविकास आघाडीची सत्ता येणार. मुख्यमंत्री होईल हे महाविकास आघाडीचे नेते ठरवतील आणि तो निर्णय घेतील.