BEST Bus Accident : मुंबईत सह्याद्री अतिथीगृहासमोर बेस्टच्या इलेक्ट्रिक बसची कारला धडक; एका महिलेचा मृत्यू

मुंबईत सह्याद्री अतिथीगृहासमोर अपघात झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

(BEST Bus Accident) मुंबईत सह्याद्री अतिथीगृहासमोर अपघात झाला आहे. बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने कारला धडक दिला असून हा अपघात झाला आहे. बेस्टची इलेक्ट्रिक बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारवर जाऊन आदळली.

या अपघातात एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाला असून ही महिला या कारच्या शेजारी उभी होती. ही महिला मॉर्निंग वॉकला निघाली असून त्यादरम्यान हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com