Baramati: रोहित पवारांना ईडीचा मोठा धक्का, कन्नड सहकारी साखर कारखान्यावर जप्ती

कन्नड सहकारी साखर कारखान्यावर जप्ती आणलेली आहे. बारामती अ‍ॅग्रो कंपनीनं हा कारखाना खरेदी केला होता.
Published by :
Dhanshree Shintre

कन्नड सहकारी साखर कारखान्यावर जप्ती आणलेली आहे. बारामती अ‍ॅग्रो कंपनीनं हा कारखाना खरेदी केला होता. रोहित पवारांना ईडीचा मोठा धक्का मानला जात आहे. कन्नड कारखाना बारामती अ‍ॅग्रोकडून खरेदी करण्यात आला होता. कारखाना खरेदीत गोलमाल झाल्याचा ईडीचा आरोप कन्नड सहकारी साखर कारखान्यावर जप्ती करण्यात आली आहे. बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड कंपनीला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने साखर कारखान्यांची बेकायदेशीर विक्री केल्याच्या प्रकरणात PMLA कायद्या अंतर्गत ईडीने 50.20 कोटींची एकूण संपत्ती जप्त केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com