OBC Student : ओबीसी विद्यार्थांना मोठा दिलासा

ओबीसी विद्यार्थांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना इंग्रजी व विज्ञान विषयांसाठी आता शिक्षक मिळणार आहेत.
Published by :
Team Lokshahi

ओबीसी विद्यार्थांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना इंग्रजी व विज्ञान विषयांसाठी आता शिक्षक मिळणार आहेत. 141 खाजगी अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमाशाळांसाठी 282 शिक्षकांचा पदे मंजूर करण्यात आलेली आहे. विज्ञान शाखेसाठी वाढीव प्रत्येकी २ विषय शिक्षकांची पदे मंजूर झाली आहेत. ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी अधिवेशनात आश्वासन दिले होते. कला, वाणिज्य किंवा कला, विज्ञान अशा दोन विद्या शाखा असलेल्या आश्रमाशाळांसाठी एकूण ८ शिक्षक मिळणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com