BJP : रायगडसह मावळच्या जागेवर पुन्हा भाजपचा दावा

रायगड बरोबरच मावळ लोकसभा जागेसाठी भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

रायगड बरोबरच मावळ लोकसभा जागेसाठी भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मावळ आणि रायगडची जागा भाजपलाच मिळावी असा आग्रह भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष निरीक्षक आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर धरला आहे. आज डॉ. सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत आणि पेण इथे पक्षाच्या मेळावे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी जर रायगडची जागा भाजपला मिळाली नाही तर फार वाईट होईल, असा धमकीवजा इशारा पेणचे आमदार रवींद्र पाटील यांनी दिला. त्यावर बोलताना डॉ. प्रमोद सावंत यांनीही कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर केला. भाजपची ताकद पाहता कार्यकर्त्यांची मागणी चुकीची नाही. मी देखील भाजपला उमेदवारी मिळेल असे प्रयत्न करीन. यावेळी कोकणातील कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही असे सावंत यांनी स्पष्ट केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com