BJP Protest Kolhapur | कोल्हापुरात राहुल गांधींविरोधात भाजपचं आक्रमक; जाहीर निषेधचे बॅनर घेऊन निषेध

कोल्हापुरात राहुल गांधींविरोधात भाजप पक्षाने आंदोलन केलं आहे. ऐतिहासिक बिंदू चौकात भाजपने आंदोलन केलं.
Published by :
Team Lokshahi

कोल्हापुरात राहुल गांधींविरोधात भाजप पक्षाने आंदोलन केलं आहे. ऐतिहासिक बिंदू चौकात भाजपने आंदोलन केलं तर घोषनाबाजी करत राहूल गांधींचा निषेध करण्यात आलेला आहे. आरक्षणावरील वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाल्याचं कोल्हापूरमध्ये पाहायला मिळालं.

त्यावर भाजपचे कार्यकर्ता म्हणाले, राहूल गांधींनी असं सांगितलं की हे आरक्षण आम्ही संपवणार आहे, त्यामुळे आरक्षणाचे खरे मारेकरी कोण असतील तर ते कॉंग्रेस आणि राहूल गांधी आहेत. संपूर्ण भाजप पक्षाच्या वतीनं आणि तमाम जनतेच्या वतीनं आम्ही त्यांचा निषेध करतं आहोत. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीमध्ये कॉंग्रेसला आणि राहूल गांधीला हा समाज महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com