Sangola : सांगोल्यात भाजप-शिवसेने अंतर्गत वाद, आमचं ठरलंय म्हणत शिवसेनेचा निंबाळकरांना इशारा

सांगोल्यात भाजप-शिवसेनेत अंतर्गत वाद निर्माण झालेला आहे. भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकरांवर शिवसेनेचे नेते नाराज आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

सांगोल्यात भाजप-शिवसेनेत अंतर्गत वाद निर्माण झालेला आहे. भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकरांवर शिवसेनेचे नेते नाराज आहेत. रणजीतसिंह निंबाळकरांवर विश्वासात घेत नसल्याचे आरोप करण्यात आले आहेत. तसेच आमचं ठरलं आहे म्हणत शिवसेनेचा निंबाळकरांना इशारा सुद्धा आहे. रणजीतसिंह नाईक निंबाळकरांसमोरील अडचणी आता वाढताना दिसत आहेत.

मी विद्यमान खासदार साहेबांना सांगू इच्छितो की, दादा आपण ज्या वेळेस २०१४ ला निवडणूक लढवली त्यावेळेस तुमच्या मागे जे असंख्य कार्यकर्ते होते असंख्य जनता दिवसाची रात्र करुन आपणांस विजयी करण्यासाठी जे काबाडकष्ट घेतले आणि तुम्ही आज सध्या तालुक्यातील अडीज तिकीट घेऊन फिरताय त्या अडीज तिकीटाच्या जीवावर तालुका येत नसतो. तालुक्यातील सर्व-सामान्य गोर-गरीब कष्टकरी शेतकरी कर्मचारी यांच्यापर्यंत पोहोचणं तुमचं काम होतं तुम्ही पोहचले नाही असुद्या. जे काही आमचं ठरलं आहे येणाऱ्या निवडणूकीच्या निकालामध्ये आम्ही दाखवून देऊ की योग्य निर्णय कसा असतो आणि जनतेचा नेता कसा असतो असा शिवसेनेचा निंबाळकरांना इशारा आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com