Dhule : धुळ्यात उपमुख्यमंत्री फडणवीसांना दाखवले काळे झेंडे, 12 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

धुळ्यात उपमुख्यमंत्री फडणवीसांना काळे झेंडे दाखवले. आदिवासी कोळी समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
Published by :
Dhanshree Shintre

धुळ्यात उपमुख्यमंत्री फडणवीसांना काळे झेंडे दाखवले. आदिवासी कोळी समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आदिवासी कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्न सत्तेत आल्यावर तातडीने सोडवू असं आश्वासन 2014 मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र, दहा वर्षे उलटूनही आदिवासी कोळी समाजाच्या मागण्या मान्य न झाल्याने आज शिरपूर येथील सभा पूर्ण करून फडणवीस जळगावकडे जात असताना काळे झेंडे दाखवत आक्रमक झालेल्या आदिवासी कोळी समाज बांधवांनी फडणवीस यांचा निषेध केला.

शिरपूर तालुक्यातील करवंद नाका परिसरात हा प्रकार घडला असून यावेळी बाराहून अधिक निषेधकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शिरपूरमध्ये आले होते. यावेळी परत जात असताना फडणवीस यांच्या ताफ्याला हे काळे झेंडे दाखवण्यात आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com