Vidarbh Sabha : विदर्भात प्रचार सभांचा धडाका, योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदींची सभा

विदर्भात आज प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपुरमध्ये सभा आहे.
Published by :
Dhanshree Shintre

विदर्भात आज प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपुरमध्ये सभा आहे. चंद्रपुरात मोदींची संध्याकाळी 4 वाजता सभा होणार आहे. युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वर्धा, भंडारा आणि नागपुरात सभा होणार आहेत. वर्ध्यात उद्या दुपारी 12 तर संध्याकाळी 4 वाजता भंडारा येथे जाहीर सभा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रामटेकमध्ये जाहीर सभा होणार आहे.

मुख्यमंत्री रामटेक येथे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारसभेत सहभागी होणार. आज संध्याकाळी नागपूर लोकसभा मतदारसंघात दक्षिण- पश्चिम विधानसभा परिक्षेत्रात भाजपा लोकसभा उमेदवार नितीन गडकरी यांच्यासोबत त्यांची प्रचार यात्रा निघणार आहे. 10 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रामटेक लोकसभा मतदारसंघात कन्हान येथे सभा घेणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com