Video : भारतीय किनारपट्टीवर आली 25 फुट लांब ब्लू व्हेल; बघ्यांची गर्दी, काही जण चढलेही!

Video : भारतीय किनारपट्टीवर आली 25 फुट लांब ब्लू व्हेल; बघ्यांची गर्दी, काही जण चढलेही!

आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी एक ब्लू व्हेल वाहून आली. ही व्हेल सुमारे 25 फूट लांब आणि पाच टन वजनाची आहे.

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी एक ब्लू व्हेल वाहून आली. ही व्हेल सुमारे 25 फूट लांब आणि पाच टन वजनाची आहे. घटनास्थळावरील फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात जवळपासच्या गावातील लोक समुद्रकिनाऱ्यावर व्हेल पाहण्यासाठी जमलेले दिसत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून दक्षिणेकडील राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, श्रीकाकुलमसह आंध्र प्रदेशातील आठ ठिकाणी गेल्या 24 तासांत 7 सेमी पाऊस झाला आहे. अशात, श्रीकाकुलममधील संताबोमाली मंडलातील मेघवरम समुद्रकिनाऱ्यावर ब्लू व्हेल वाहून आली आहे. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर ब्लू व्हेलचे आगमन दुर्मिळ असल्याचे स्थानिक मच्छिमारांचे म्हणणे आहे. यामुळे बघ्यांची गर्दी जमली होती. तर, काही जण सेल्फीही काढत होते.

दरम्यान, ब्लू व्हेल हा ग्रहावरील सर्वात मोठा प्राणी आहे, त्याचे वजन 200 टन आहे. त्याचे हृदय फोक्सवॅगन बीटलच्या आकारात आहे. जागतिक वन्यजीव महासंघच्या मते, प्राण्याचे पोट एक टन क्रिल धारण करू शकते आणि त्याला दररोज सुमारे चार टन क्रिल खावे लागते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com