Breaking News: संसदेतील गोंधळावर सरकार-विरोधी पक्षांचा तोडगा ;संविधानावरील चर्चेवर सर्वपक्षीय सहमती

संसदेतील गोंधळावर सरकार आणि विरोधी पक्षांचा तोडगा; संविधानावरील चर्चेवर सर्वपक्षीय सहमती, कामकाज सुरळीत होण्याची अपेक्षा.
Published by :
Team Lokshahi

संसदेतील गोंधळावर सरकार-विरोधी पक्षांचा तोडगा निघाला आहे. संविधानावरील चर्चेवर सर्वपक्षीय सहमती देण्यात आली आहे. आजपासून कामकाज सुरळीत होण्याची अपेक्षा देखील वर्तविण्यात येत आहे.

सोमवारी विविध पक्षांच्या गटनेत्यांबरोबर बैठक घेतली. संविधान सभेने संविधान स्वीकारण्याच्या घटनेला २६ नोव्हेंबर रोजी ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा करावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती आणि ती मागणी सरकारकडून स्विकारण्यात आली.

25 नोव्हेंबरला संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून पेच निर्माण झाला होता. त्याच्यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांदरम्यान सोमवारी सहमती झाली. तर संविधान स्वीकृतीला 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेत चर्चेच्या तारखा जाहीर करून तसे संकेत देण्यात आले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com