Ahmednagar : नाशकात लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई, दोन अधिकाऱ्यांना 1 कोटींची लाच घेताना अटक

राज्यातील सर्वात मोठी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
Published by :
Team Lokshahi

नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अहमदनगर मध्ये कारवाई करत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यांना तब्बल एक कोटीची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

शासकीय ठेकेदाराला दोन कोटी 66 लाख रुपयांचे थकीत बिल मंजूर करून देण्यासाठी ही लाच स्वीकारली असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली असून यामध्ये धुळ्याचे कार्यकारी अभियंता गणेश वाघ यांचा देखील सहभाग आहे. सध्या ते फरार असून त्यांचा शोध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून घेण्यात येत आहे, तर अमित गायकवाड यांच्या मालमत्ता चौकशीचे आदेश देखील देणार असल्याची माहिती विश्वास नागरे पाटील यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com