Budget 2025 : सोन्याचे भाव तेजीत, बजेट 2025 मध्ये गोल्ड ज्वेलरी मार्केटसाठी कोणताही दिलासा नाही

कस्टम ड्युटी आणि जीएसटी कमी केल्यास ग्राहकांना फायदा होईल - सोने व्यापार
Published by :
Team Lokshahi

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पाचे वाचन केले होते. त्यानंतर भारतीय शेअर बाजारातून मोठी घसरण पाहायला मिळत आहे. तर सोन्याचे भाव मात्र तेजीत आहे. सोन्याच्या भावाने 85 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. भारतीय शेअर बाजाराचा सोन्याच्या भावावर परिणाम झाला नसल्याचे मत व्यापारांकडून केले जात आहे.

सोने व्यापारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कालच्या बजेटमध्ये गोल्ड ज्वेलरी मार्केटसाठी काही दिलासा नव्हता , मागील ६ महिन्यापुर्वी सरकारने ९ टक्के कस्टम ड्युटी कमी केली होती... त्यामुळे सोनं ६०००ते ७००० हजारापर्यंत कमी झाले होते... सरकारने कस्टम ड्युटी आणि जीएसटी कमी केली तर ग्राहकांना त्यांचा नक्कीच फायदा होईल सोने व्यापारानी प्रतिक्रिया दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com