Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजीचं वातावरण, सेन्सेक्स 77 हजार, निफ्टीही 23 हजार 400 अंकांवर

शेअर मार्केटमध्ये तेजीचं वातावरण पाहायला मिळतंय. सेन्सेक्स 77 हजारांवर, निफ्टीही 23 हजार 400 अंकांवर गेला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

शेअर मार्केटमध्ये तेजीचं वातावरण पाहायला मिळतंय. सेन्सेक्स 77 हजारांवर, निफ्टीही 23 हजार 400 अंकांवर गेला आहे. मोदींच्या शपथविधीनंतर बाजारात तेजी पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स 387 अंकांनी वधारला, निफ्टीमध्ये 39 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून सलग तिसरा टर्म सुरू करण्याची शपथ घेतल्याने सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टी नव्या उच्चांकावर उघडले. सेन्सेक्सने 77,000 चा स्तर ओलांडला तर निफ्टी 23,400 च्या आसपास व्यवहार करत होता. रविवारी पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर आज मंत्रालय वाटप अपेक्षित आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com