Yavatmal Bus Fire : यवतमाळमध्ये 10 ते 12 अज्ञात इसमांनी पेटवली बस, प्रवासी सुरक्षित

उमरखेड मध्ये अज्ञातांनी बस पेटवली. बस मधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. नागपूर बोरी तुळजापूर महामार्गावरील विदर्भ मराठवाडा सीमारेषेवर पैनगंगा नदी पुलावरील उमरखेड जवळील मार्लेगाव येथील ही घटना घडली आहे.
Published by :
Team Lokshahi

उमरखेड मध्ये अज्ञातांनी बस पेटवली. बस मधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. नागपूर बोरी तुळजापूर महामार्गावरील विदर्भ मराठवाडा सीमारेषेवर पैनगंगा नदी पुलावरील उमरखेड जवळील मार्लेगाव येथील ही घटना घडली आहे. घटनास्थळी उमरखेड नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाने ही आग अथक प्रयत्न करीत आटोक्यात आणली. बस पूर्ण जळून खाक झाली आहे. नागपूरपासून नांदेडला बस जात होती. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात मराठा आंदोलनकर्त्यांनी बस पेटवल्याची चर्चा सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com