Washim : महायुतीकडून एसटीमार्फत प्रचार, प्रचारासाठी 'लालपरी'चा आधार

राज्यात सध्या सर्वत्र लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. उमेदवारी, कार्यकर्ते गावोगावी प्रचारात व्यस्त आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

राज्यात सध्या सर्वत्र लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. उमेदवारी, कार्यकर्ते गावोगावी प्रचारात व्यस्त आहेत. वाशीममध्ये प्रचारासाठी लालपरिचा आधार घेण्यात आला आहे. महायुतीच्या प्रचाराच बॅनर एसटीवर पाहायला मिळतंय.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुक विभागाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत सार्वजनिक मालकीच्या वाहतुकीवर याची परवानगी कशी? अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. कानाकोपऱ्यात महायुती पोहचत असल्याने महायुतीकडून सत्तेचा गैरवापर तर होत नाही ना? निवडणूक विभागाच्या निदर्षणात येऊन याबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com