Fellowship Exam : रद्द... रद्द ...बार्टी, सारथी, महाज्योती फेलोशिप परीक्षा अखेर रद्द

बार्टी, सारथी, महाज्योतीची फेलोशिप परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे अखेर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Published by :
Team Lokshahi

बार्टी, सारथी, महाज्योतीची फेलोशिप परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे अखेर हा निर्णय घेण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मंगळवारी झालेल्या बैठकीत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता जानेवारीमध्ये पुन्हा परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती आहे. पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून घेण्यात आलेल्या या परीक्षेत 2019 मध्ये झालेल्या सेट परीक्षेची प्रश्नपत्रिकाच फेलोशीपच्या विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ झाला होता. मात्र त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. यानंतर पुणे विद्यापीठाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com