WFI Chief Sanjay Singh: मोठी बातमी! कुस्ती महासंघाची मान्यता रद्द

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा कुस्ती महासंघाला मोठा धक्का दिला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.
Published by :
Team Lokshahi

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा कुस्ती महासंघाला मोठा धक्का दिला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. सोबतच भारतीय कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झालेले संजय सिंह यांचेही निलंबन करण्यात आलं आहे. कुस्तीपटूंच्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. संजय सिंह हे बृजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय मानले जात होते, पण संजय सिंह यांची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने अखेर हा निर्णय घेतला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com