ललित पाटील पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळाल्याची थिअरी खोटी?

ड्रग्ज माफिया ललित पाटील पोलिसांच्या संगनमतानेच पळून गेल्याची माहिती समोर आलेली आहे.
Published by :
Team Lokshahi

ड्रग्ज माफिया ललित पाटील पोलिसांच्या संगनमतानेच पळून गेल्याची माहिती समोर आलेली आहे. तो पोलिसाच्या हाताला झटका देऊन पळाल्याची थिअरीच खोटी असल्याचं तपासात पुढे आले आहे. पोलीस तपासात ललित पाटील सहज चालत हॉटेलमध्ये जात असल्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. ललित ससून शेजारच्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तो परत आला नाही म्हणून ललितला शोधण्यासाठी काळे नावाचा पोलीस कर्मचारी हॉटेलमध्ये गेल्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यामुळे ललित पाटील पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळाल्याची थिअरी खोटी असल्याची माहिती समोर आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com