चंद्रकांत पाटलांनी घेतली सुशीलकुमार शिदेंची भेट; कारणही आलं समोर

चंद्रकांत पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपकडून ऑफर असल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. अशातच, चंद्रकांत पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. सुशीलकुमार शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीचं कारणही समोर आलं आहे. सोलापुरातील नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष हे चंद्रकांत पाटील आहेत. या नाट्य संमेलनाचं आमंत्रण देण्यासाठी चंद्रकांत पाटील सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानी गेले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com