व्हिडिओ
Chandrapur Heat : बापरे! देशात चंद्रपुर सर्वात हॉट, तापमान 45.6 अंशांवर
चंद्रपूर देशातील सर्वाधिक उष्ण शहर, ओडिशातील झारसुगुडा दुसऱ्या स्थानावर
सर्वाधिक उष्ण एप्रिल महिना, देशातील सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस इतकी सर्वाधिक तापमानाची नोंद सोमवारी विदर्भातील चंद्रपूरमध्ये करण्यात आली आहे. मागील वर्षी मे महिन्यात एवढा पारा पाहायला मिळाला होता, जो यावर्षी एप्रिलमध्येच पाहायला मिळत आहे.
चंद्रपूर हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले असून ओडिशातील झारसुगुडा हे 45.4 अंश सेल्सिअससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा एकदा विदर्भातीलच ब्रम्हपुरी हे तापमान 45 अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. पुढील 5 दिवस मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.