व्हिडिओ
'महायुतीमध्ये पालकमंत्रीपदाबाबत अजिबात वाद नाहीत, तिढा सुटणार' - चंद्रशेखर बावनकुळे
महायुतीमध्ये पालकमंत्रीपदाबाबत वाद नाहीत, तिढा लवकरच सुटणार, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
राज्यात महायुतीतील नेत्यांना देण्यात आलेल्या पालकमंत्रिपदावरुन चांगलीच नाराजी समोर येताना दिसत आहे. यावरच महायुतीमध्ये पालकमंत्री पदाबाबत फार वाद नाहीत, आमच्यामध्ये आपापसात सहमती होईल असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. यापूर्वी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन होते. त्यामुळे गिरीश महाजन यांना आगामी कुंभमेळ्याची जबाबदारी देण्यात आली होती. आता मुख्यमंत्री आल्यावर, तिन्ही नेते बसतील आणि ठरवतील असंही बावनकुळेंनी म्हटलंय.