व्हिडिओ
सरकारला मॅनेज करुन घेऊ असं अधिकाऱ्यांना वाटत असेल तर...; चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान
देवेंद्र फडणवीस सरकार नियमाच्या बाहेर जाऊन कोणतेही काम करणार नाही.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे की, कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला तलाठ्यापासून कलेक्टरपर्यंत, मंत्रालयापासून नागपूरपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याला आता पैसे देऊन आपल्याला आपल्या बदल्या करुन घेता येणार नाही. कुणालाही त्याठिकाणी प्रशासनामध्ये आता शिफारशीची गरज त्याठिकाणी कुणीही समज करुन घेऊ नये की, की हे सरकार आम्ही कसेही मॅनेज करू.
देवेंद्र फडणवीस सरकार नियमाच्या बाहेर जाऊन कोणतेही काम करणार नाही. आम्ही सर्व लोक कोणत्याही पद्धतीने प्रशासकीयबाबीमध्ये याठिकाणी कोणावरही अन्याय करणार नाही. आता हा मेसेज पक्का आहे. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.