Nagpur : 'राम मंदिर सोहळ्यादिवशी राम नामाचा जप करा' मुस्लीम राष्ट्रीय मंचाचं मुस्लीम समाजाला आवाहन

22 जानेवारीला अयोध्येत रामलला यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे.त्यात मुस्लीम समाजानेही या अभिषेक सोहळ्यात सहभागी व्हावे.
Published by :
Team Lokshahi

22 जानेवारीला अयोध्येत रामलला यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे.त्यात मुस्लीम समाजानेही या अभिषेक सोहळ्यात सहभागी व्हावे. त्यासाठी मुस्लीम राष्ट्रीय मंचने मुस्लिम समाजाला आवाहन सुरू केले आहे की ज्या दिवशी प्रभू रामाचा प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यादिवशी मशिदी, मदरसे, दर्ग्यांमध्ये आणि घरोघरी राम-राम, जय श्री राम, जय श्री रामचा जयघोष करावा अशी माहिती मुस्लिम राष्ट्रीय मंचचे राष्ट्रीय संयोजक विराट पाचपोर यांनी दिली. ही एक युगप्रवर्तक घटना आहे. मुस्लीम समाजही याच्याशी निगडित आहे. राम मंदिरासाठी आंदोलन असो वा निधी संकलन, जसे वेटीकल हटवता येत नाही, काबा हटवता येत नाही, त्याचप्रमाणे अयोध्या हे रामाचे जन्मस्थान मानले जाते. मुस्लिमांचे रामाचे जन्मस्थान म्हणून इमामे हिंदची धारणा आहे की अशा प्रकारे इमामे हिंद हटवता येणार नाही. सर्वांच्या इच्छेनुसार तेथे भव्य मंदिर बांधले जात आहे. 22 जानेवारीला ज्याप्रमाणे हिंदू समाजातील लोक आपली घरे, मंदिरे आणि घरांमध्ये दिवे लावतील, त्याचप्रमाणे मुस्लिम समाजातील लोकांनीही 22 जानेवारीला आपली घरे, मशिदी, प्रार्थनास्थळे भव्यपणे सजवावीत. यासाठी राष्ट्रीय मुस्लिम मंच लोकांशी संपर्क करत आहे आणि आवाहन करत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com