Chhagan Bhujbal : अनधिकृत होर्डींग लावणारे भावेश भिडे ठाकरेंच्या जवळचे असल्याचा आरोप, भुजबळांची प्रतिक्रिया

भावेश भिडे, ज्याने तो अनधिकृत होर्डिंग लावला होता त्याचा उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो भाजपने ट्विट केला आहे.

भावेश भिडे, ज्याने तो अनधिकृत होर्डिंग लावला होता त्याचा उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो भाजपने ट्विट केला आहे. भावेश भिडे उद्धव ठाकरेंच्या जवळचे असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. भावेश भिडेंसोबत उद्धव ठाकरे आणि अरविंद सावंत यांचा फोटो देखील ट्विट करण्यात आला आहे.

यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "आता सरकार आमचं आहे, महानगरपालिका सुद्धा आमचीच आहे. उद्धव ठाकरेंचा काय संबंध. असे अनेक लोकं असतात, ते आमच्याकडे सुद्धा येतात फुलांचा गुच्छ घेऊन, फोटो काढतात. त्यांना आम्ही नाही बोलू शकत नाही. कोण आहे, कोणता कार्यकर्ता आहे की नाही हे सुद्धा कधी कधी लक्षात येत नाही. सगळ्यांकडे त्यांच्यासोबतचे फोटो असतात. त्याच्यावरुन काही माहिती काढणं योग्य आहे असं मला वाटत नाही."

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com