एकनाथ खडसेंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांचे बॅनर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. मुक्ताईनगर मध्ये तापी नदीच्या पुलाच्या भूमिपूजनासह जाहीर सभा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांचे महानायक म्हणून बॅनर लावण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुक्ताईनगरमध्ये जाहीर सभा होणार आहे. जाहीर सभेपूर्वीच हे बॅनर लावण्यात आले आहे. बॅनरवर महानायक असा उल्लेख करण्यात आला आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com