भावाचा राग देवेंद्रजींवर काढू नका; सुळेंच्या 'त्या' टीकेवर चित्रा वाघ यांचा टोला

सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका; चित्रा वाघ यांचं राज्याच्या मोठ्ठ्या ताई म्हणत सुळेंना प्रत्युत्तर

मुंबई : राज्यातील परिस्थिती अशांत असताना फडणवीस दुसऱ्या राज्याच्या प्रचारात व्यस्त असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्याच्या मोठ्ठ्या ताई म्हणत सुळेंना प्रत्युत्तर दिले आहे. तुमची कावेबाज ‘माणुसकी’ प्रत्यक्षात हिडीस आणि ओंगळ आहे. ज्या पद्धतीनं परिस्थिती चिघळवणारी वक्तव्यं करताय त्यावरून तुमच्या खोटारड्या ‘माणुसकी’चा बुरखा टराटरा फाटलाय. आपल्या भावाचा राग तुम्ही देवेंद्रजी यांच्यावर काढू नका, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी घणाघात केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com