Eknath Shinde: CIDCOच्या घरांच्या किंमतीचा पुनर्विचार करा; बैठकीत उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचे आदेश
सिडकोच्या घरांच्या वाढलेल्या किमतींच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे आमदार विक्रांत पाटील यांनी काल आंदोलन केल्यानंतर आज बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सिडकोच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढण्यात आले. सिडकोच्या घरांच्या किमती संदर्भात झालेल्या निर्णयावर विक्रांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गरींबासाठी सिडकोनी बांधलेली घरं म्हणजेच गरीबांना नवी मुंबईत राहता यावं म्हणून घरांची निर्मिती होते. तिथे किमती या परवडणाऱ्या असल्या पाहिजेत परंतू सिडकोनी त्या किमती वाढवून ठेवल्या आहेत. त्यामुळे त्या विषयाच्या बैठका पाच वेळा आजपर्यंत प्रलंबित झाल्या होत्या. आज ही बैठक झाली. त्यामध्ये सिडको अधिकाऱ्यांच्या ज्या काही चुका आहेत त्यांच्याच सगळे सूचना आम्ही त्यांना दाखवल्या आणि सांगितली की कशाप्रकारे तुम्ही या घरांची किंमत आकारताना चुका केलेल्या आहेत.
त्यामुळे उपमुख्यमंत्री महोदयांनी सगळं समजून घेतलं त्यांनाही अनेक विषय जाणावले की कशाप्रकारे सिडकोने चुका केल्या आहेत म्हणून त्यांनी या विषयमध्ये नाराजी व्यक्त केली. त्यामुळे त्यांनी सिडकोच्या घरांच्या किंमतीचा पुनर्विचार करा आणि त्यानंतर तुम्ही माझ्याकडे या अशा सूचना दिलेल्या आहेत.
