Navi Mumbai
Navi Mumbai

Navi Mumbai : नवी मुंबईत ड्रग्ज तस्कर आणि पोलिसांमध्ये झटापट; उलवे परिसरातील घटना

नवी मुंबईत ड्रग्ज तस्कर आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Navi Mumbai ) नवी मुंबईत ड्रग्ज तस्कर आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे पाहायला मिळत आहे. नवी मुंबई उलवे परिसरात ही घटना घडली. 31 जानेवारीला रात्री साडेअकराच्या सुमारास मुंबई पोलिसांची 10 जणांची टीम ड्रग्ज तस्करांना पकडण्यासाठी उलवेमध्ये पोहचली.

त्यावेळी आरोपींनी तलवार, हॉकीसारख्या शस्त्रांनी हल्ला करण्यास सुरूवात केली. सार्वजनिक रस्त्यावर ड्रग्ज तस्कर खुलेआम शस्त्रांसह फिरत असल्याने नवी मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या प्रकरणी इस्माईल शेख, शाहिद खानसह अन्य आरोपींवर भारतीय न्याय संहितेअंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Summary

  • नवी मुंबईत ड्रग्ज तस्कर आणि पोलिसांमध्ये झटापट

  • नवी मुंबईच्या उलवे परिसरातील घटना

  • झटापटीचा व्हिडिओ LOKशाही मराठीच्या हाती

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com