विरोधी पक्षनेत्यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी

ज्या पक्षाच्या जास्त जागा त्या पक्षाचे विरोधी पक्षनेता, या सूत्राप्रमाणे शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवाादीला विश्वासात न घेता आंबादास दानवे यांची निवड केली. मग काँग्रेसचे आक्रमक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निर्वाणीचा इशारा दिला.
Published by  :
Team Lokshahi

ज्या पक्षाच्या जास्त जागा त्या पक्षाचे विरोधी पक्षनेता, या सूत्राप्रमाणे शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवाादीला विश्वासात न घेता आंबादास दानवे यांची निवड केली. मग काँग्रेसचे आक्रमक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निर्वाणीचा इशारा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील नाराजी व्यक्त करण्यात मागे राहिले नाही, तर अजित पवार यांनी मात्र हे प्रकरण सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

विरोधी पक्षनेतेपदाबाबत काँग्रेससोबत आमची चर्चा झाली नाही हे खरे, पण तो विषय तितका महत्त्वाचा नाही. भाजप व बंडखोरांविरोधात लढणे महत्त्वाचे आहे. भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढले पाहिजे, ही भूमिका सोनिया गांधी, शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी ठरवली आहे. त्यामुळे आघाडीबाबत हे तिघेच काय ते ठरवतील, असा टोला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पटोले यांना लगावला. राज्याच्या पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून सुरु होत असतांना महाविकास आघाडीतील ही बिघाडी भाजप-शिंदे सेनेच्या पथ्यावर पडणार आहे...

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com