Shikhar Bank Scam : शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करा, आर्थिक गुन्हे विभागाची कोर्टाला विनंती

(शिखर बँक) कथित 25 हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण (ईओडब्ल्यू) विभागाने विशेष न्यायालयात अर्ज केला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आरोपी असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या (शिखर बँक) कथित 25 हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण (ईओडब्ल्यू) विभागाने विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती राहुल रोकडे यांच्यापुढे 'सी' समरी अहवाल दाखल केला. न्यायालयाने यावरील पुढील सुनावणी 15 मार्च रोजी ठेवली. पोलिसांनी दाखल केलेला 'सी' समरी रिपोर्ट स्वीकारायचा की नाकारून पोलिसांना या प्रकरणात आरोपपत्र सादर करण्याचे निर्देश द्यायचे, याबाबत आता विशेष न्यायालय निर्णय घेईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com