CM Eknath Shinde | Ladki Bahin Yojana |'आमची लाडकी बहीण योजना सुपरहीट' मुख्यमंत्री शिंदे

लाडकी बहीण योजना आणि त्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसोबत संवाद साधला होता.

लाडकी बहीण योजना आणि त्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसोबत संवाद साधला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी ठाण्यातील बहिणींसोबत भेटीगाठी केल्या आणि त्यादरम्यान बहिणींसोबत चर्चा देखील केल्या.

एकनाथ शिंदे म्हणाले की, मला आनंद आहे कारण आमची लाडकी बहीण योजना यशस्वी झाली सुपरहीट झाली असं म्हणा. आम्ही जो काही बहीणींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहत आहोत तो अनपेक्षित आहे. कारण एवढ्या लवकर योजना सुरु होणं त्याचे पैसे खात्यात जमा होण आणि विरोधकांनी याच्याबद्दल अफवा पसरवनं यासगळ्यामधून आमच्या बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद हा खरा आहे. त्यामुळे त्यांना इतर योजना देखील देण्यात आलेल्या आहेत. मग त्यात लाडकी लेक लखपती, मुलींचं मोफत शिक्षण, जेष्ठांसाठी योजना, मोफत गॅस सिलेंडर अशा अनेक योजना आम्ही काढलेल्या आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com