Congress : काँग्रेसची राज्यातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, कोणाला कुठून उमेदवारी?

काँग्रेसची राज्यातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

काँग्रेसची राज्यातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. रामटेकमधून रश्मी बर्वे, नागपुरातून विकास ठाकरेंना उमेदवारी देण्यात आली आहे. तर गडचिरोलीतून नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. चंद्रपूरमधून कोण लढणार यावर मात्र पडदा कायम असल्याच पाहायला मिळतंय.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होत असलेल्या पाचपैकी चार मतदारसंघांसाठी आज काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली. नागपूरमधून आमदार विकास ठाकरे, रामटेकमधून रश्मी बर्वे, भंडारा- गोंदियामधून डॉ. प्रशांत पडोळे, गडचिरोली-चिमूरमधून डॉ. नामदेव किरसान या चार उमेदवारांची नावे आज रात्री काँग्रेसने जाहीर केली. मात्र, चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवाराचे नाव काँग्रेसने गुलदस्त्यात ठेवले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com