Balasaheb Thorat : रावेर लोकसभेच्या जागेवर काँग्रेसचा दावा - बाळासाहेब थोरात

जळगावमध्ये शरद पवारांच्या सभेत रावेर लोकसभा मतदारसंघात खडसेंनी धनुष्यबाण उचलावा असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलं होतं.
Published by  :
Team Lokshahi

जळगावमध्ये शरद पवारांच्या सभेत रावेर लोकसभा मतदारसंघात खडसेंनी धनुष्यबाण उचलावा असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलं होतं. मात्र रावेर लोकसभेच्या जागेवर काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा दावा कायम केला आहे. कोणी काहीही म्हटलं असेल तरी दावा कायम राहणार आहे. रावेरची जागा ही आधीपासून काँग्रेसची आहे आणि काँग्रेसलाच मिळाली पाहिजे. रावेरच्या जागेसाठी आघाडीमध्ये मागणी कायम राहील, असं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com