Vijay Wadettiwar: प्रकाश आंबेडकरांबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य

प्रकाश आंबेडकर मविआमध्ये असावेत अशी भूमिका उद्धव ठाकरे, शरद पवार आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षांची आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी असं वक्तव्य केलं आहे.
Published by :
Team Lokshahi

प्रकाश आंबेडकर मविआमध्ये असावेत अशी भूमिका उद्धव ठाकरे, शरद पवार आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षांची आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी असं वक्तव्य केलं आहे.

बोलणी सकारात्मक आणि अंतिम टप्प्यात आहेत. मविआची लोकसभेची यादी महायुतीच्या आधी जाहीर होईल. कॉंग्रेसकडे 101 उमेदवार आहेत, आम्ही अजून पत्ते उघड केले नाही. नागपुरची जागा जिंकण्यासाठी शक्तिशाली, ताकदवान आणि 100 टक्के जिंकणारे उमेदवार आहेत कॉंग्रेसकडे आहेत. सर्वेच पत्ते एकाच वेळीस उघड करायचे नसतात. आम्ही योग्य वेळ आल्यावर ते नक्कीच उघड करू. कॉंग्रेसकडून तगडा नाही तर जिंकणारा उमेदवार नागपूरात दिसेल असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com